राजा मानवतेचा

श्री. महेश पारकर

दाही दिशा अन त्रिभुवन अवघे कीर्ति शिवरायांची मिरविते ।
मानवी पराक्रमांची परिसीमा अथांग ब्रह्मांड व्यापुनी गर्जते ।। १ ।।

स्वराज्य रयतेचे, राजा रयतेचा अनोखी कथा मंडळ व्यापते ।
रोमांचित होऊनी आजही धरती विद्युल्लतेने शिवतेजाच्या शहारते ।। २ ।।

गडकोट आणि उंच डोंगरमाथे साथ मुरार-बाजी-तानाजींची ।
शिवरायांच्या उत्तुंग पराक्रमाची ध्वजा शिखरा शिखरातून प्रकटते ।। ३ ।।

सर्वगुणसंपन्न मूर्ती तयांची मन-बुद्धीस गवसणी समृद्धतेची ।
नीतीवंत, कर्तुत्ववंत सर्वोच्च जगती कणखर राजे पथदीप जाहले ।। ४ ।।

आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।। ५ ।।

– श्री. महेश पारकर, ज्येष्ठ साहित्यिक (कोकणी आणि मराठी), शिरोडा, गोवा.