नाशिक येथे विमा प्रतिनिधीकडून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

विमा प्रतिनिधी सुभाष देशमुख यांनी ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. येथील युनियन बँकेत हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे ठेवीदार चिंतेत आहेत.

बारामती सहकारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब !

मुळशी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये यंदा ‘धनशक्ती’चा वापर होत असल्याचा आरोप केला होता.

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून ९ कोटी रुपयांचे कर्ज उचलणारे संचालक अभिषेक जैस्वाल यांना अटक !

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिषेक जैस्वाल आणि मलकापूर को-ऑपरेटीव्ह बँकेत घोटाळा केल्याप्रकरणी त्यांचा भाऊ अंबरीश यांना आर्थिक गुन्हे शाखेने २५ एप्रिलच्या रात्री ११ वाजता अटक केली.

शिखर बँकेतील कथित घोटाळ्याची चौकशी बंद करण्याची मुंबई पोलिसांची मागणी !

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत कोणत्याही प्रकारे अनियमितता नाही. त्यामुळे बँकेतील कथित घोटाळ्याचे अन्वेषण बंद करावे, अशी विनंती राज्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष न्यायालयाकडे केली आहे.

पुणे येथील ‘रोझरी स्कूल’चे संचालक विनय अरहाना यांसह दोघे अटकेत !

सीआयडीच्या पथकाने कर्ज अपव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) दोघांना कह्यात घेतले. दोघांना मध्यरात्री शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

अर्बन बँकेतून संमत कर्ज रकमेतील काही रक्कम बँकेच्या अधिकार्‍यांना दिल्याची कर्जदार वैकर यांची माहिती !

अर्बन बँकेतून संमत कर्ज रकमेतून २० लाख रुपये बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांना रोख रूपात देऊन १० लाख रुपये बँकेचे अधिकारी हेमंत बल्लाळ यांना दिल्याची कबुली अविनाश वैकर यांनी पोलीस अन्वेषणात दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची सलग २ दिवस ‘ईडी’कडून चौकशी !

आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ बारामती तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन या कारवाईचा निषेध केला.

अजित पवार यांना दुसर्‍यांदा ‘क्लिन चीट’ (निर्दाेष)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांविरोधात पुरावे नाहीत, अशी भूमिका पुन्हा एकदा मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने घेत त्यांना ‘क्लिन चीट’ दिली आहे.

बँकांचा भ्रष्टाचार आणि उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने या भ्रष्टाचार प्रकरणाची ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

नगर अर्बन बँकेच्या घोटाळा प्रकरणी २ आरोपींना पोलीस कोठडी !

नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कह्यात घेतलेल्या २ वरिष्ठ अधिकार्‍यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नगर अर्बन बँकेच्या अपव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अन्वेषण चालू होते.