बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ त्वरित लागू करावा !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भारतात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करून अवैधरित्या देशात रहाणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई करा ! – बजरंग दलाचे मिरज येथे निवेदन

बांगलादेशातील अल्पसंख्यांक शीख आणि हिंदू यांवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले.

बांगलादेशात हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा ! – नाशिक येथील हिंदुत्वनिष्ठांची मागणी

बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे येथील हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदु असुरक्षित ! – आमदार नीतेश राणे, भाजप

मालवणी भागातील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा ठिकाणी जाऊन आम्ही हिंदूंमध्ये धारिष्ट्य निर्माण करणार आहोत. बांगलादेशाप्रमाणे मुंबईतही हिंदू असुरक्षित आहे. मुंबईतील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहोत, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले.

बांगलादेशात हिंदूंवरील जिहादी आक्रमणांच्या विरोधात बांगलादेश, तसेच भारतातील १५ राज्यांत आंदोलन !

हिंदु जनजागृती समितीसह ३७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग
१३७ ठिकाणी सरकारला निवेदने !

केंद्र सरकारने बांगलादेश सरकारवर दबाव वाढवावा ! – विश्‍व हिंदु परिषद

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे प्रकरण
पाकिस्तानला शत्रू राष्ट्र घोषित करावे ! – विहिंपची मागणी

बांगलादेशमध्ये हिंदूवरील आक्रमणांच्या प्रकरणी ४५० जण अटकेत !

यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पंतप्रधान शेख हसिना यांनी तात्काळ प्रयत्न केले पाहिजेत, तरच या कारवाईला काही अर्थ उरतो ! तसेच ज्या हिंदूंची हानी झाली आहे, त्यांना हानीभरपाई दिली पाहिजे !

बांगलादेशचे नवे नाव ‘जिहादीस्तान’ असून पंतप्रधान शेख हसीना त्याची राणी आहेत !

भारतातील एक तरी हिंदु साहित्यिक, लेखक, खेळाडू आदी, तसेच निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध करत आहे का ? त्या तुलनेत तस्लिमा नसरीन हिंदूंना जवळच्या वाटतात !

इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही ! – बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन

बांगलादेश हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. इथे प्रत्येकाला स्वत:च्या श्रद्धा जोपासण्याचा अधिकार आहे. इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही, असे विधान बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांच्या विषयी बोलतांना म्हटले आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’कडून निषेध

बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांत हिंदू, नवरात्रोत्सव मंडप आणि श्री दुर्गादेवीच्या मूर्ती यांवर झालेल्या आक्रमणाचा ‘दक्षिण आफ्रिका हिंदु महासभे’ने निषेध केला आहे. ‘बांगलादेश सरकारने आरोपींवर तात्काळ कारवाई करून पीडितांना न्याय द्यावा, तसेच पीडितांची सुरक्षा आणि त्यांना पूजा करण्याचे स्वातंत्र्य मिळावे….