बांगलादेशमध्ये हिंदूवरील आक्रमणांच्या प्रकरणी ४५० जण अटकेत !

यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पंतप्रधान शेख हसिना यांनी तात्काळ प्रयत्न केले पाहिजेत, तरच या कारवाईला काही अर्थ उरतो ! तसेच ज्या हिंदूंची हानी झाली आहे, त्यांना हानीभरपाई दिली पाहिजे ! – संपादक

बांगलादेशमधील हिंसाचार

ढाका (बांगलादेश) – हिंदूंवरील आक्रमणांच्या प्रकरणी बांगलादेश सरकारने दिलेल्या आदेशानंतर आतापर्यंत ४५० धर्मांधांना अटक करण्यात आली आहे, तर विविध ठिकाणी ७१ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ‘कोणत्याही अधिकृत माहितीविना माध्यमांवर विश्‍वास ठेवू नये’, असे आवाहन पंतप्रधान शेख हसिना यांनी केले आहे. हिंसाचाराच्या अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी गृह मंत्रालयाला सतर्क रहाण्याची सूचना त्यांनी दिली.