मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा मुख्यमंत्री होणार ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेच्या पाठिंब्याने राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असे विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. या वेळी राज ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांप्रमाणे आम्ही सत्ता मिळवण्यासाठी स्वार्थी भूमिका घेतलेली नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : निवडणुकीसाठी भरलेले ९२१ अर्ज अवैध !; निवडणुकीसाठी ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी !…

महाराष्ट्राच्या येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांतून तब्बल ७ सहस्र ९९४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते.

भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ यांचा सकल जैन समाजाद्वारे सत्कार !

जैन आर्थिक विकास महामंडळाची महाराष्ट्र सरकारने नुकतीच स्थापना केली आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी, तसेच महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सिंचन घोटाळा चौकशीच्या धारिकेवर दिवंगत आर्.आर्. पाटील यांची स्वाक्षरी होती !

मंत्री अजित पवार म्हणाले की, मला अपर्कीत करण्याचा प्रयत्न झाला. इतक्या वर्षांत केवळ ४२ सहस्र कोटी रुपयांची कामे झाली होती, तरीही माझ्यावर ७० सहस्र कोटी रुपयांचा आरोप झाला. माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न झाला.

Himanta Sarma on Muslim Population : घुसखोरीमुळे झारखंडमध्ये मुसलमानांची संख्या वाढत आहे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्याने देशातील प्रत्येक घुसखोराला देशातून हद्दपार केले पाहिजे आणि प्रतिदिन यांची आकडेवारी जनतेला दिली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही !

उत्तराखंड राज्यात अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्यासाठी कायदा करा ! – Swami Anand Swaroop

परिस्थिती गंभीर आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्याने या प्रकरणी गांभीर्याने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा हिंदूंच्या धार्मिक स्थळी बांगलादेशासारखी स्थिती निर्माण होऊ शकते !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पूर्व विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा नाही ! ; बोरीवली पूर्व येथे शिवसेना आणि ठाकरे गट यांत बाचाबाची …

पूर्व विदर्भात ठाकरे गटाला केवळ एकच रामटेकची जागा मिळाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे. गोंदियामध्ये एकही जागा मिळालेली नाही.

भाजपचे नेते शिवाजी डोंगरे यांचे अपक्ष म्हणून उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीला शिवाजी डोंगरे यांनी विरोध दर्शवला आहे. पक्षाशिवाय निवडणूक लढणार, असा निश्चय त्यांनी माधवनगर येथे झालेल्या बैठकीत केला होता.  

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिसर्‍या टप्प्यात २५ उमेदवारांची घोषणा !

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने २५ उमेदवारांची तिसरी सूची प्रसिद्ध केली आहे. पहिल्या सूचीत ९९, दुसर्‍या सूचीत २२, तर तिसर्‍या सूचीतील २५ मिळून आतापर्यंत भाजपने एकूण १४६ उमेदवार घोषित केले आहेत

शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले !

या प्रसंगी श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोल्हापूर उत्तर भाग हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. भव्य संख्येने उपस्थित कार्यकर्ते ही एकप्रकारे विजयाची नांदीच आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीपथावर नेले.”