शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले !

या प्रसंगी श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोल्हापूर उत्तर भाग हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. भव्य संख्येने उपस्थित कार्यकर्ते ही एकप्रकारे विजयाची नांदीच आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीपथावर नेले.”

Assam CM On Rohingya : भारतात बांगलादेशातील हिंदू नाहीत, तर रोहिंग्या मुसलमान घुसखोरी करत आहेत !

आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली माहिती

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर नाही ! – खासदार संजय राऊत; वैयक्तिक शत्रुत्वात उद्धव यांचे नाव पहिले – आमदार नितेश राणे…

देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक वैर नाही. आमचे केवळ राजकीय वैर आहे, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.

सांगली येथे काँग्रेसद्वारे पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी !

सांगली विधानसभा मदारसंघातून पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली होती; मात्र जयश्री पाटील यांची मागणी फेटाळण्यात आली.

संपादकीय : विचारसरणींचा कल्लोळ !

जनमानसाला, हे राजकारण पुढे महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार ? याची धास्ती आहे. राजकीय पक्षांनी याचा सारासार विचार करून आपापल्या विचारसरणींशी प्रामाणिक राहून वाटचाल केल्यास त्यांचे, जनतेचे आणि राज्याचेही भले होईल, यात शंकाच नाही अन्यथा अपघात ठरलेलाच आहे !

भाजपकडून निवडणुकीसाठी २२ उमेदवारांची घोषणा !

भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्प्यात २२ उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी भाजपकडून ९९ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची आतापर्यंतची संख्या १२१ इतकी झाली आहे.

BJP Bhilwara Corporator’s Husband Stabbed : भीलवाडा (राजस्थान) येथे धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण

बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंवर होतात, तशी आक्रमणे भारतातील राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर अन् तेही भाजपच्या व्यक्तीवर होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

भाजपचे नेते संजयकाका पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

संजयकाका पाटील हे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

विरोधकांसाठी लाडक्या बहिणीच पुरेशा ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विरोधकांविषयी बोलायची आवश्यकता नाही. मी त्याविषयी बोलणार नाही. त्यांच्यासाठी केवळ आमच्या लाडक्या बहिणी पुरेशा आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले.

महिला राजकारणात केवळ ‘५ वर्षे पाहुण्या’ हे चित्र आता पालटावे ! – विजया रहाटकर, अध्यक्षा, केंद्रीय महिला आयोग

महिला आयोगही महिलांना माहेर वाटले पाहिजे. तेवढ्या विश्वासाने त्या आयोगाकडे आल्या पाहिजेत आणि आयोगाने त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा देशभर उभी करणार आहे’’, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.