शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले !

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे आवेदन प्रविष्ट करतांना राजेश क्षीरसागर, तसेच अन्य घटक पक्ष

कोल्हापूर, २८ ऑक्टोबर (वार्ता.) – नागरिकांची भव्य गर्दी, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यांसह भव्य शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी उत्तर मतदारसंघातून उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले. या प्रसंगी भाजप खासदार धनंजय महाडिक यांसह महायुतीमधील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उमेदवारी आवेदन प्रविष्ट करण्यापूर्वी निघालेली भव्य फेरी

या प्रसंगी श्री. राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘कोल्हापूर उत्तर भाग हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. भव्य संख्येने उपस्थित कार्यकर्ते ही एकप्रकारे विजयाची नांदीच आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीपथावर नेले. त्यामुळे राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे.’’