काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणासाठी पाकिस्तानकडून नशेखोर तरुणांचा वापर !

पाकिस्तान आता काश्मीर खोर्‍यातील अमली पदार्थांच्या नशेमध्ये अडकलेल्या मुसलमान तरुणांना अमली पदार्थ देऊन त्यांचा ग्रेनेड फेकणे, शस्त्र हिसकावणे, निवडणूक लढणार्‍यांंना बंदुकीच्या धाकावर धमकावणे आदींसाठी वापर करवून घेत आहे.

हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कधी होणार ?

तमिळनाडू हिंदु महासभेचे राज्य सचिव नागराज यांची होसूर येथील आनंदनगरातील त्यांच्या घराजवळ अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. काही मासांपूर्वी नागराज यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी करूनही पोलिसांनी ती नाकारली होती.

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या, तर मुलगा घायाळ !

देहलीमधील पोलीस खाते केंद्रातील भाजप सरकारच्या अखत्यारीत असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे अपेक्षित नाही !

बंगालमध्ये भाजप महिला नेत्याच्या वाहन ताफ्यावर आक्रमण

भाजपच्या नेत्या भारती घोष यांचा वाहनताफा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून आक्रमण केले, असा आरोप घोष यांनी केला.

एन्.सी.बी.चे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह कर्मचार्‍यांवर आक्रमण

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एन्.सी.बी. चे) तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतर कर्मचार्‍यांवर आक्रमण करण्यात आले आहे. अमली पदार्थ विकणार्‍यांकडून (ड्रग्ज पेडलर्सकडून) हे आक्रमण मुंबईतील गोरेगावमध्ये २२ नोव्हेंबरच्या सायंकाळी केले आहे.

(म्हणे) ‘राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडा !’ – रझा अकादमी

मुसलमान त्यांची प्रार्थनास्थळे कशी निर्माण करतात, हे लक्षात येईल !

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !

हसनपूर (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरातील श्री महाकालीदेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

हे मंदिर वर्ष १११३ मध्ये बांधण्यात आले आहे. ही घटना २० नोव्हेंबर या दिवशी उघड झाली, जेव्हा भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

अमेरिकेत मॉलमधील गोळीबारात ८ जण घायाळ

अमेरिकेतील विस्कॉन्सिन भागातील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात एका लहान मुलासह ८ जण घायाळ झाले असून पोलीस गोळीबार करणार्‍याचा शोध घेत आहेत.

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

हसनपूर (कर्नाटक) येथील डोड्डागडावल्ली चतुशकुता मंदिरातील श्री महाकालीदेवीची मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे मंदिर वर्ष १११३ मध्ये होयसल वंशातील राजा विष्णुवर्धन याच्या शासनकाळात बांधण्यात आले आहे.