सायखेडा (नाशिक) येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनजागृती करणार्‍या पोलिसांवरच २ तरुणांचे आक्रमण

येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘गर्दी करू नका, एकत्र येऊ नका’, असे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरच २ तरुणांनी आक्रमण केले. त्रिमूर्ती चौकात पोलिसांनी तरुणांच्या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांतील अमोल कुटे आणि संतोष कुटे यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली.

कोरोनाविषयी केवळ संरक्षक न होता त्याच्या विरोधात आक्रमक नीती वापरा ! – जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रयासस

कोरोना इतक्या झपाट्याने पसरतो आहे की, त्याच्या विरोधात संरक्षक नीती न वापरता आपण आक्रमक नीती वापरायला हवी. कोरोनाला हरवता येऊ शकते; पण त्याच्याशी लढण्यासाठी फूटबॉल खेळाच्या सामन्याला जशी नीती वापरतो, तशी रणनीती वापरावी लागेल

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात

चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे संकट असतांनाही तो भारताच्या नौदलाची माहिती काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, हे यातून लक्षात येते !