काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणासाठी पाकिस्तानकडून नशेखोर तरुणांचा वापर !

डावपेचात हुशार असलेला पाक ! काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे, हाच एकमेव उपाय !

प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू – पाकिस्तान आता काश्मीर खोर्‍यातील अमली पदार्थांच्या नशेमध्ये अडकलेल्या मुसलमान तरुणांना अमली पदार्थ देऊन आतंकवादी कारवायांसाठी वापर करून घेत आहे. त्यांचा ग्रेनेड फेकणे, शस्त्र हिसकावणे, निवडणूक लढणार्‍यांंना बंदुकीच्या धाकावर धमकावणे आदींसाठी वापर करण्यात येत आहे.

पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रणरेषा, आंतरराष्ट्रीय सीमा आणि ड्रोन यांद्वारे या तरुणांना अमली पदार्थ अन् शस्त्र पुरवत आहे. खोर्‍यात जूनपासून आतापर्यंत झालेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हत्या करण्यामध्ये अशा नशेखोर तरुणांचा समावेश असल्याची शंका सुरक्षायंत्रणांना आहे.