(म्हणे) ‘राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडा !’ – रझा अकादमी

 

मुसलमान त्यांची प्रार्थनास्थळे कशी निर्माण करतात, हे यावरून लक्षात येईल !

मुंबई – रझा अकादमीने राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे; मात्र राजभवनामध्ये कोणतीही मशीद नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. राजभवनच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणी भाष्य करण्यास नकार दिला आहे.

मुसलमान कर्मचार्‍यांना नमाज पढता यावे म्हणून कर्मचारी निवासस्थानामधील एक खोली देण्यात आलेली होती. हळूहळू बाहेरून येणारे इतर सामान्य लोकही या ठिकाणी नमाज पढू लागले. त्यामुळे या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. त्यानंतर शुक्रवारी बाहेरील लोक येथे नमाजासाठी येऊ लागले. (म्हणून मशीद नसलेल्या जागी नमाजासाठी अनुमती का देण्यात येऊ नये, हे यावरून लक्षात येईल ! – संपादक)

कोरोनाच्या काळात गर्दी वाढत असल्यान सर्वसामान्य नागरिकांना आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.

रझा अकादमीचे महासचिव एम्. सईद नुरी यांनी मात्र त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, देशात सगळीकडे धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. असे असतांना राजभवनातील कर्मचार्‍यांना मशिदीत शुक्रवारचा नमाज करण्यासाठी अनुमती देण्यात आलेली नाही. केवळ पाच ते सात लोकांना नमाजासाठी अनुमती देण्यात आली आहे. तात्काळ आदेश काढून कर्मचार्‍यांना कोरोनापूर्वीप्रमाणेच नमाज पढण्यासाठी अनुमती देण्यात यावी. (कोरोनाकाळातील नियमांनुसार धार्मिक स्थळांमध्येही अल्प क्षमतेने अनुमती देण्यात आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशी मागणी करणे कितपत योग्य आहे ? – संपादक)