राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ३०.१.२०२२

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

आपण खरोखरीच ‘प्रजासत्ताक’ आहोत का ?

भारतात ८० टक्के प्रजा ही हिंदु आहे. या हिंदु प्रजेची येथे सत्ता आहे का ? सध्या देशाच्या विविध भागांत हिंदूंवर होणारे अन्याय पाहिले तर आपण खरोखरच ‘प्रजासत्ताक’ आहोत का ? असा प्रश्न उपस्थित रहातो.

धर्मांतरबंदी कायदा हवाच !

कॉन्व्हेंट शाळांच्या संदर्भात हिंदु मुलींना टिकली लावण्यास, बांगड्या घालण्यास अथवा भारतीय पोषाख घालून येण्यास मज्जाव करण्यात येतो. हिंदु मुलांच्या हातातील दोरे कापण्यात येतात, टिळा लावण्यास अथवा गळ्यात देवतांची पदके घालण्यास विरोध करण्यात येतो….

पीडित काश्मिरी हिंदूंच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू ! – सुशील पंडित, संस्थापक, ‘रुट्स इन काश्मीर’

१९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा !’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. या क्रूर घटनेला ३१ वर्षे पूर्ण झाली, तरी काश्मिरी हिंदूंना न्याय मिळालेला नाही, या निमित्ताने हा ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता.

अरियालूर (तमिळनाडू) येथे कॉन्व्हेंट शाळेच्या छळाला कंटाळून हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या !

अशा घटनांविषयी तथाकथित निधर्मीवादी आणि सर्वधर्मसमभाववाले गप्प का ?
अशा घटनांच्या बातम्या राष्ट्रीय वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे दडपतात, हे लक्षात घ्या !

मध्यप्रदेशातील सुराना गावातील धर्मांधांच्या दहशतीला कंटाळून हिंदू पलायन करण्याच्या सिद्धतेत !

भारतात ठिकठिकाणी धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूंवर पलायन करण्याची वेळ आली आहे. मध्यप्रदेशमधील सुराना गावात तेच घडत आहे. केंद्रात आणि मध्यप्रदेशात भाजपची सत्ता असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

भिंगार (जिल्हा नगर) येथे हनुमान चालिसा लावल्याने धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला मारहाण !

हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांकडून मार खाणार आहात ? आतातरी त्यांना धडा शिकवा !

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची अवस्था

‘पाकिस्तानमध्ये हिंदु, शीख, ख्रिस्ती आणि कादियानी यांना अल्पसंख्यांक मानण्यात आले आहे. आतंकवादी संघटनां अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.

हिंदूंनी म्हटले तर ‘हेट स्पीच’ आणि अहिंदूंनी म्हटले, तर ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’, हे कधीपर्यंत चालणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

हिंदु संत आणि नेते यांना अटक करून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे हिंदु समाज कदापि सहन करणार नाही’, असे समितीने पत्रकात म्हटले आहे.

हिंदु मुलगा आणि मुसलमान मुलगी यांच्या प्रेमाला धर्मांधांकडून सर्वत्र होणारा विरोध आणि समाजातील मुसलमान प्रतिष्ठितांचा हिंदु मुलींशी निकाह मात्र बिनविरोध !

मागील भागात आपण मुसलमान कुटुंबात हिंदु मुलगी हिंदु धर्माचे पालन करू शकते का ?, राजकारण्यांचा हिंदु मुलीने मुसलमान मुलाशी विवाह करण्यास असलेला पाठिंबा, लव्ह जिहादचा क्रूर इतिहास आदी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहू.