|
|
रतलाम (मध्यप्रदेश) – जिल्ह्यातील सुराना येथील गावात धर्मांधांकडून केला जाणार्या छळाला कंटाळून तेथील हिंदूंनी धर्मांधांच्या विरोधात जिल्हाधिकार्यांना पत्र लिहिले आहे. ‘आम्हाला साहाय्य न केल्यास आम्ही ३ दिवसांत आमचे घर, शेती आणि संपत्ती सर्व सोडून गावातून पलायन करू’, अशी चेतावणी हिंदूंनी या पत्राद्वारे दिली आहे. या गावाची लोकसंख्या २ सहस्र २०० इतकी आहे. त्यांपैकी ६० टक्के लोकसंख्या मुसलमान, तर ४० टक्के हिंदू आहेत. या पत्राची नोंद घेऊन रतलामचे जिल्हाधिकारी या गावाला भेट देणार आहेत. गावात धर्मांधांकडून हिंदूंना धमकावणे, त्यांना मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार नित्याचे झाल्यामुळे तेथील हिंदू दहशतीखाली वावरत आहेत.
MP: Hindu families threaten to leave Surana alleging harassment; govt brokers resolution https://t.co/UmQLDezvQg
— Republic (@republic) January 20, 2022
राज्याच्या गृहमंत्र्यांकडून घटनेची नोंद !
राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त केली असून ‘या प्रकरणी प्रशासनाशी चर्चा करू’, असे सांगितले आहे. ‘आमचा प्रदेश हा शांतीचा प्रदेश आहे. येथे कुणीही भय पसरवू शकत नाही’, असे सांगत त्यांनी गावातील लोकांना आश्वस्त केले आहे.
धर्मांधांकडून हिंदूंवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न !
‘या गावात पूर्वी हिंदू आणि मुसलमान मिळून मिसळून रहात होते; मात्र मागील २-३ वर्षांपासून धर्मांधांकडून गावातील युवकांना शिव्या देणे, त्यांना मारहाण करणे आणि त्यांना धमकावणे असे प्रकार वाढीस लागले आहेत. गावात धर्मांधांची संख्या वाढल्यामुळे ते हिंदूंवर दबाव निर्माण करत आहेत’, असे गावातील हिंदूंचे म्हणणे आहे.
पोलीस अधीक्षकांकडून हिंदूंवर कारवाई करण्याची धमकी !काही दिवसांपूर्वी गावात होणार्या या प्रकारांची माहिती हिंदूंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट देऊन दिली. ‘त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी आमचे घर पाडण्याची, तसेच आमच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची धमकी दिली’, असा हिंदूंनी आरोप केला आहे. हिंदु जनजागृती समितीकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी !हिंदु जनजागृती समितीने या प्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच पोलीस महासंचालक यांना यांच्याकडे हिंदूंचा छळ करणार्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. |