खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
धर्मांधांकडून शिवमंदिर कह्यात घेऊन तेथे थडगे बांधण्यात येत असल्याचा हिंदुत्वनिष्ठांचा आरोप
बडी चौपड, जयपूर येथे शिवमंदिराला टाळे !
‘जयपूर (राजस्थान) येथील बडी चौपड येथे शिवमंदिराला टाळे लावण्यात आले आहे. या ठिकाणी धर्मांधांकडून थडगे बांधण्यात येत असल्याचा आरोप येथील हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. यासंदर्भात ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.’
हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याची शपथ देणार्या व्यापार्यावर गुन्हा नोंद !
‘कोरबा (छत्तीसगड) येथील एका व्यापार्याने हिंदूंना अग्नीच्या साक्षीने ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याची आणि स्वतःच्या आस्थापनांमध्ये केवळ हिंदूंना काम देण्याची शपथ दिली. यावरून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शपथ देणार्या व्यापार्याचे नाव प्रमोद अग्रवाल आहे. ते हिंदु सुरक्षा सेनेसाठी काम करतात.’
धर्मसंसदेतील विधानांवरून महंतांवर कारवाई होते, तशी द्वेषपूर्ण भाषणे करणार्या मुसलमान नेत्यांवरही कारवाई व्हावी ! – हिंदु सेनेचे विष्णु गुप्ता यांची सर्वाेच्च न्यायालयात मागणी
|
‘डिसेंबर २०२१ मध्ये हरिद्वार येथे झालेल्या धर्मसंसदेमध्ये कथित आक्षेपार्ह विधाने केल्यावरून यती नरसिंहानंद, जितेंद्र त्यागी आदींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने नोंद घेतली होती. या पार्श्वभूमीवर आता हिंदु सेनेचे अध्यक्ष श्री. विष्णु गुप्ता यांनी सर्वाेच्च न्यायालयात अर्ज करून ‘जर धर्मसंसदेच्या प्रकरणी हिंदूंवर कारवाई होत असेल, तर द्वेषपूर्ण भाषणे करणारे खासदार असदुद्दीन ओवैसी, मौलाना (इस्लामचे विद्वान) तौकीर रझा, साजिद रशिदी, ‘आप’चे आमदार अमानतुल्ला खान, एम्.आय.एम्.चे नेते वारिस पठाण आदी मुसलमान नेत्यांवरही कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी’, अशी मागणी केली आहे.’
देहलीच्या यमुना खादर भागात धर्मांधांकडून अनधिकृत थडगी उभारून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण !
देहली प्रशासनाचे दुर्लक्ष !
एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असेल, तर जनतेच्या पैशांवर जगणार्या संबंधित अधिकार्यांना सरकारने बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक
‘यमुना खादर भागामध्ये धर्मांधांकडून अनधिकृतपणे थडगी उभारण्यात आली आहेत. जेथे एक वीटही लावणे अवैध आहे, त्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर विविध थडगी बांधण्यात येऊन मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. ही थडगी मुसलमान सिद्धपुरुषांची असल्याचे सांगण्यात येत आहे. हा भाग संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनशील मानण्यात येत असल्याने सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. ज्या ठिकाणी हे अतिक्रमण करण्यात आले आहे, तेथून आयकर विभागाचे कार्यालय आणि देहली पोलीस मुख्यालय जवळच आहे. ‘असे असतांना या कारस्थानाकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे’, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.’
अमेरिकी अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन यांनी काश्मिरी हिंदूंविषयी व्यक्त केली संवेदनशीलता !
|
‘जगभर धार्मिक छळ चालू आहे. आज आपल्याला भारतामध्ये वर्ष १९९० मधील ‘पलायन दिवसा’ची भीषणता आठवते. तेव्हा काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील इस्लामी आतंकवाद्यांच्या नरसंहारामुळे पळून जावे लागले होते. माझ्या प्रार्थना काश्मिरी हिंदूंसमवेत आहेत; कारण अजूनही अनेक लोक त्यांच्या प्रिय लोकांसाठी, तसेच त्यांच्या घरांसाठी शोक करत आहेत’, अशा शब्दांत अमेरिकी अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन यांनी ‘काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनदिना’च्या निमित्त ट्वीट करून संवेदना व्यक्त केल्या. भारताचे राष्ट्रगीत आणि ‘ओम जय जगदीश हरे’ हे भक्तीगीत गायल्यानंतर मिलबेन भारतात अन् अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये पुष्कळ लोकप्रिय झाल्या आहेत.’
(म्हणे) ‘हिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती दिली, तर अशी स्थिती निर्माण करू की, सांभाळणे कठीण होईल !’
|
|
‘मी अल्लाची शपथ घेऊन सांगतो की, हिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती दिली जात असेल, तर आम्ही अशी स्थिती निर्माण करू की, ती सांभाळणे कठीण होईल. मी एक धार्मिक सैनिक आहे. रा.स्व. संघाचा दलाल नाही की, भीतीपोटी घरात लपून बसीन. जर यांनी अनुचित कृती केली, तर अल्लाची शपथ त्यांना घरात जाऊन मारीन. मी आज केवळ चेतावणी देत आहे. मी मतांसाठी निवडणूक लढवत नाही, तर धर्मासाठी लढत आहे, असे विधान पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंह सिद्धू यांचे सल्लागार महंमद मुस्तफा यांनी मालेरकोटला (पंजाब) येथे एका कार्यक्रमात केले.’