पुण्यात भारत-इंग्लंड सामन्याच्या वेळी सट्टेबाजी, मैदानालगतच थाटलेला सट्टेबाजांचा अड्डा उद्ध्वस्त !

क्रिकेटच्या सामन्यांत बुकींचा सुळसुळाट असतो, असे आतापर्यंत अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याचा अर्थ त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलेला नाही, हेच दिसून येते. बुकींचा कायमस्वरूपी बंदोबस्त केव्हा करणार ?

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पुन्हा अटक

असे गुंड प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्‍न काय सोडवणार ?

मुंबईमध्ये नात आणि मुलगी यांच्यावर बलात्कार करणार्‍या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

अशा प्रकारच्या घटना हे समाजातील वाढत्या व्यभिचाराचे लक्षण आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच समाजाची झालेली ही अधोगती लक्षात घेऊन आतातरी नैतिक शिक्षण देणार्‍या शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा !

बावळाट येथे पुन्हा पोलिसांनी अवैध मद्याची वाहतूक रोखली : दोघांना अटक

पोलिसांनी अवैध प्रकार करणार्‍यांसमवेत हातमिळवणी केली आहे, असे समजायचे का ?

रुग्णावर उपचार करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी पुणे येथील आधुनिक वैद्याला अटक

असे लाचखोर वृत्तीचे आधुनिक वैद्य रुग्णावर कसे उपचार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

राज्य सरकारच्या नगररचना विभागाच्या निलंबित सहसंचालकास अटक !

पुणे जिल्ह्यात बनावट दस्तऐवजाच्या आधारे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांस ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

गुजरात बॉम्बस्फोटामधील आरोपीला पुणे येथून १५ वर्षांनंतर अटक !

अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्थानक येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे पोलिसांच्या साहाय्याने गुजरात आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) मोहसीन पूनावाला याला वानवडी परिसरातून २३ मार्च या दिवशी अटक केली.

डेहराडून (उत्तराखंड) येथील हिंदु युवा वाहिनीने १५० मंदिरांबाहेर लावले अन्य धर्मियांना मंदिरात प्रवेशबंदी असल्याचे फलक !

मक्केमध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नाही, तर मग हिंदूंच्या मंदिरांमध्ये अन्य धर्मियांना हिंदूंनी प्रवेश नाकारला, तर ते चुकीचे कसे ?

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकार्‍यासह एका सट्टेबाजाला अटक

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने आणखी २ जणांना अटक केली आहे. यात निलंबित पोलीस अधिकारी विनायक शिंदे आणि सट्टेबाज नरेश धरे यांचा समावेश आहे.

गृहमंत्र्यांच्या त्यागपत्रासाठी मुंबईत आंदोलन करणारे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांना अटक

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रासाठी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करणार्‍या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली.