मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकार्‍यासह एका सट्टेबाजाला अटक

डावीकडून मनसुख हिरेन विनायक शिंदे

मुंबई – मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात आतंकवादविरोधी पथकाने आणखी २ जणांना अटक केली आहे. यात निलंबित पोलीस अधिकारी विनायक शिंदे आणि सट्टेबाज नरेश धरे यांचा समावेश आहे.

विनायक शिंदे हे एका बनावट चकमक प्रकरणातील आरोपी असून ते मे २०२० पासून पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहेत. विनायक शिंदे फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलीस आयुक्त कार्यालयात आले होते. त्यांनी सचिन वाझे यांचीही भेट घेतली असल्याचे पोलिसांना अन्वेषणात आढळून आले आहे. राज्यांतर्गत असलेल्या आतंकवादविरोधी पथकाकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे.

२ दिवसांपूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेनेही हे प्रकरण अन्वेषणासाठी स्वत:कडे घेतले आहे.