सावंतवाडी – तालुक्यातील सातोळी-बावळाट येथे नाकाबंदी चालू असतांना २७ मार्चला जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अवैध मद्याची वाहतूक करणार्या दोघांना अटक केली. या वेळी त्यांच्याकडून अवैध मद्य आणि टेम्पो, असे एकूण २२ लाख रुपयांचे साहित्य पोलिसांनी कह्यात घेतले. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी भंगाराच्या आडून अवैध मद्याची वाहतूक करण्याचा डाव पोलिसांनी उधळला होता.
पोलिसांची कारवाई चालू असली, तरी सातत्याने लाखो रुपयांच्या मद्याची वाहतूक कशी चालू रहाते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
(गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतांना मार्गावर गोवा राज्य पोलीस खात्याचे तपासणी नाकेही आहेत. असे असतांना लाखो रुपयांचे अवैध मद्य घेऊन गाड्या जिल्ह्यात येतात. याचा अर्थ या तपासणीनाक्यांवर योग्यप्रकारे तपासणी होत नाही, असे समजायचे कि पोलिसांनी अवैध प्रकार करणार्यांसमवेत हातमिळवणी केली आहे, असे समजायचे ? – संपादक)