मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रासाठी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करणार्या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रती मासाला १०० कोटी रुपयांच्या वसुलीची मागणी करत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यागपत्र द्यावे, यासाठी भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर, आमदार राम कदम, आमदार पराग अळवणी, आमदार सुनील राणे, आमदार मिहीर कोटेचा, आमदार पराग शहा यांच्यासह अन्य नेते आणि कार्यकर्ते यांना अटक करण्यात आली.