बँक डेटा चोरी प्रकरणी एकाच खात्यात १०० कोटी रुपये असल्याची माहिती उघड

देशभरातील वेगवेगळ्या अधिकोषातील काही खात्यांची गोपनीय माहिती मिळवणे आणि त्यांची विक्री करून त्याद्वारे कोट्यावधी रुपये कमवणे असा कट नुकताच पुणे सायबर पोलिसांनी उघडकीला आणला आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मेरठ येथे महिलांची अंतर्वस्त्रे चोरणार्‍या दोघा वासनांध धर्मांधांना अटक

मेरठ येथे तरुणींची अंतर्वस्त्रे चोरणारे रोमिन अब्बासी आणि महंमद अक्कास यांना पोलिसांनी अटक केली आहे.

देहली येथे तंदूर रोटी बनवतांना त्यावर थुंकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

अशा धर्मांधांना अनेक दिवस उपाशी ठेवण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

देशी बनावटीचे पिस्तूल आणि गावठी कट्टा यांची तस्करी करणार्‍यास अटक !

कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील रेल्वे फाटकाजवळ १६ मार्च या दिवशी गावठी कट्ट्यासह पिस्तुलाची तस्करी करणारे अभिजीत उपाख्य पप्पू लक्ष्मण मोरे यांना कराड पोलिसांनी अटक केली आहे. मोरे यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

केळघर (जिल्हा सातारा) येथे सीमा शुल्क विभागाची धाड

सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तावळी तालुक्यातील केळघर येथे एका ‘फार्म हाऊस’वर धाड टाकण्यात आली. तेथे २३ किलो ६३१ ग्रॅम इतका गांजा आढळून आला असून तो शासनाधीन करण्यात आला आहे.

सचिन वाझे यांच्या अटकेचा सरकारच्या भवितव्यावर कोणताही परिणाम नाही ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सचिन वाझे यांचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण चालू आहे. जे चुकीचे काम किंवा पदाचा दुरुपयोग करत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी सहकार्य करू.

अधिकोषांच्या गोपनीय डाटा चोरीप्रकरणात पुणे येथे ९ जणांना अटक !

अधिकोषांमध्ये असलेल्या निष्क्रीय खात्यांचा गोपनीय डाटा अवैध मिळवून त्याद्वारे अब्जावधी रुपयांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंतरराज्य टोळीला सायबर गुन्हे शाखेने पकडले आहे.

शरद पवार यांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आलेल्या अटकेवरून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर आरोप करण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

उत्तर कोपर्डे (जिल्हा सातारा) येथील खासगी सावकारी करणार्‍यास अटक

अनधिकृतपणे खासगी सावकारी करणारे विजय उपाख्य विराट विलास चव्हाण यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले.

देहली, केरळ आणि कर्नाटक येथील धाडीतून इस्लामिक स्टेटशी संबंधित ५ जिहाद्यांना अटक

अशांना कारागृहात ठेवून पोसण्यापेक्षा जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !