काश्मीरमध्ये ३ चकमकींमध्ये ४ आतंकवादी ठार; एका आतंकवाद्याला अटक

काश्मीरमध्ये सुरक्षादलाकडून शोधमोहीम

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींत ४ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तसेच एका आतंकवाद्याला जिवंत पकडण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये २ आतंकवादी लष्कर-ए-तोयबा, तर २ जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनांचे असल्याची माहिती समोर आली आहे.

पुलवामा येथे झालेल्या चकमकीत २ आतंकवादी, तर हंदवाडा येथे १ आणि गांदरबल येथे १ आतंकवादी ठार झाला. (कितीही आतंकवादी ठार केले, तरी जोपर्यंत पाकला संपवण्यात येणार नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही ! – संपादक)