चीन आणि भारत यांच्यातील सैन्य स्तरावरील बैठक देपसांग आणि डेमचोक येथून चीनने त्याचे सैन्य माघारी न्यावे ! – भारताची मागणी

अशा मागण्यांना चीन भीक घालणार नाही. त्यासाठी आक्रमक धोरण राबवून चिनी सैनिकांना तेथून हाकलून लावणे आवश्यक आहे ! – संपादक 

नवी देहली – भारत आणि चीन यांच्यातील १५ वी सैनिकी कमांडर स्तरावरील बैठक ११ मार्च या दिवशी लडाखच्या चुशुल मोल्डो येथे झाली. यामध्ये लडाख येथील सीमेवरून सैन्याला मागे घेण्यावरून चर्चा करण्यात आली. या वेळी भारताने देपसांग आणि डोमचोक येथे तैनात चिनी सैन्याला मागे घेण्यास भारताने सांगितले. सकाळी १० वाजता चालू झालेली ही बैठक रात्री उशिरा संपली. या बैठकीविषयी दोन्ही देशांच्या सैन्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवरील एप्रिल २०२० पूर्वीची स्थिती ठेवण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हा वाद सुटलेला नाही, असे सांगण्यात येत आहे. या सीमेवर दोन्ही देशांचे प्रत्येकी ५० सहस्र सैनिक अद्यापही तैनात आहेत.