रशियन सैन्याला ९ मे पर्यंत युद्ध संपवण्याचा आदेश असल्याचा युक्रेनचा दावा

दुसर्‍या महायुद्धात ९ मे या दिवशीच रशियाने जर्मनीच्या नाझी सैन्यावर मिळवला होता विजय !

मॉस्को (रशिया) – रशिया ९ मेपर्यंत युद्ध संपवू इच्छित आहे; कारण त्याच्या सैन्याला तसा आदेश देण्यात आला आहे, असा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. ९ मे हा दिवस दुसर्‍या महायुद्धात रशियाने जर्मनीच्या नाझी सैन्यावर विजय मिळवल्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

‘रशिया आमच्या सहस्रो नागरिकांना त्याच्या देशात घेऊन जात आहे’, असा आरोप युक्रेनने केला आहे. या नागरिकांना ओलीस ठेवत आम्हाला युद्धात माघार घेण्यास भाग पाडण्याचा कट असल्याचाही युक्रेनचा दावा आहे. युक्रेनचे लोकपाल डेनिसोवा यांनी ४ लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या इच्छेविरूद्ध रशियात नेण्यात आले असून त्यामध्ये ८४ सहस्र लहान मुले असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे रशियानेही ‘या लोकांनाच रशियाला जायचे होते’, असे सांगितले आहे.