भारतमाता आणि हिंदु देवता यांची विकृत चित्रे काढणार्‍या म.फि. हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात ठेवू नयेत !

हुसेन यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कृत्याचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येऊ नये. तरीही हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात लावल्यास त्या विरोधात आंदोलन करावे लागेल !

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

याचिकाकर्त्याने धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या पुस्तकामध्ये सलमान खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना इस्लामिक स्टेट आणि बोको हराम या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली आहे.

साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांच्यासारख्या हिंदुविरोधी विकृतांना बोलावू नका ! – ब्राह्मण महासंघ

‘‘जावेद अख्तर यांचे मराठीमध्ये काय योगदान आहे ? फ्रान्सिस दिब्रिटो असो कि जावेद अख्तर यांना ना हिंदु धर्माचे प्रेम आहे, ना त्याविषयी आदर आहे. अशा हिंदुविरोधी लोकांना सन्मान देऊ नये, अशी ब्राह्मण महासंघाची भूमिका आहे.’’

५० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहूनही ‘मराठी’ न येणार्‍या गीतकार जावेद अख्तर यांना मराठी साहित्य संमेलनात पायघड्या कशासाठी ?

एकीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा आणि दुसरीकडे हिंदी अन् उर्दू गीतकार जावेद अख्तर यांना पायघड्या ! हा मराठी भाषेचा अवमानच !

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !

पाकमधून देहलीत आलेल्या हिंदु शरणार्थींचे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून केले जात आहे धर्मांतर !

भारताच्या राजधानीत असे होणे हिंदूंना लज्जास्पद ! हा प्रयत्न हिंदु संघटनांनी वैध मार्गाने रोखणे आवश्यक आहे !

ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास मुलगा होईल’, असे आमीष दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात जागृत आणि संघटित असणार्‍या गावकर्‍यांचे अभिनंदन ! देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यामुळेच अजूनही मिशनर्‍यांचे फावते आहे. हे पहाता केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा करणे आवश्यक आहे !

केरळमधील ‘ललित कला अकॅडमी’कडून देश, हिंदु धर्म आणि गाय यांचा अवमान करणार्‍या व्यंगचित्राला पुरस्कार !

नास्तिकतावादी आणि राष्ट्रघातकी विचारांच्या कम्युनिस्ट सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? हिंदूंनी याविरोधात संघटित होऊन पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

तीव्र विरोधानंतर गीतकार जावेद अख्तर यांना उद्घाटक म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित

मराठी भाषेसाठी योगदान देणार्‍यांनाच मराठी साहित्य संमेलनाला निमंत्रित करणे उचित आहे ! गेल्या अनेक वर्षांपासून तसे होत नसल्यामुळेच साहित्य संमेलनाची पत झपाट्याने घसरत आहे ! याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे !