श्रीकृष्णजन्मभूमीतील वादग्रस्त मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदु महासभेच्या नेत्याला अटक

मथुरा – श्रीकृष्णजन्मभूमी परिसरात असलेल्या वादग्रस्त शाही ईदगाह मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारे हिंदु महसभेचे नेते सौरभ शर्मा यांना अटक करण्यात आली. शर्मा हे मशिदीत जाऊन लड्डू गोपाळाच्या मूर्तीवर जलाभिषेक करून तेथे हनुमान चालिसाचे पठण करणार होते. या प्रकरणी साहाय्यक पोलीस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह म्हणाले की, हिंदु महासभेने ६ डिसेंबर या दिवशी मशिदीत जाऊन लड्डू गोपाळाच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्याची आणि हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती.

त्या पार्श्‍वभूमीवर हिंदु महासभेच्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या ८ नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी श्रीकृष्णजन्मभूमी तसेच परिसर येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. श्रीकृष्णजन्मभूमीच्या परिसरात होणारी वाहतूकही पूर्णपणे रोखण्यात आली आहे. ‘या प्रकरणी सामाजिक संकेतस्थळांवर चिथावणीखोर पोस्ट प्रसारित करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार’, असे पोलिसांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा जलद गतीने निकाल लागण्यासाठी सरकारने प्रयत्न करून सत्य परिस्थिती समोर आणल्यास असले प्रकार वारंवार घडणार नाहीत !