अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये विविध ठिकाणी ‘हलाल प्रमाणपत्र’ विषयावर प्रबोधन

‘हिंदरक्षक संघटने’च्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे 

इंदूर (मध्यप्रदेश) – आज केवळ मांसच नाही, तर प्रत्येक उत्पादनासाठी सशुल्क हलाल प्रमाणपत्र देण्यात येत आहे. हाऊसिंग कॉम्प्लेक्स आणि रुग्णालये यांनाही हलाल प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहेत. अशा प्रकारे अल्पसंख्यांकांच्या धर्मात सांगितलेली हलाल संकल्पना बहुसंख्यांक हिंदूंवर का थोपवण्यात येत आहे ? एका धर्मनिरपेक्ष देशात अशा प्रकारे धार्मिक मान्यतांविषयी प्रमाणपत्र देणे घटनाविरोधी नाही का ? आज या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून मिळालेले कोट्यवधी रुपये राष्ट्रनिर्मितीसाठी नव्हे, तर न्यायालयात आतंकवाद्यांची बाजू मांडण्यासाठी वापरण्यात येतात. थोडक्यात या प्रमाणपत्रामुळे हिंदूंचे उद्योग आणि रोजगार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे या राष्ट्रविरोधी अर्थव्यवस्थेला उखडून फेका आणि हलाल प्रमाणित उत्पादनांचा बहिष्कार करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

मार्गदर्शन करतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
कार्यक्रमाला उपस्थित धर्मनिष्ठ
मार्गदर्शन करतांना श्री. आनंद जोखोटिया आणि व्यासपिठावर उपस्थित मान्यवर

‘हिंदरक्षक संघटने’च्या वतीने येथील सिंधी कॉलनीतील संत प्रीतमदास सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते संबोधित करत होते. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थित होती. हिंदरक्षक संघटनेचे संयोजक श्री. एकलव्य गौड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. समितीचा कार्य परिचय समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी करून दिला. या कार्यक्रमाचा ३०० हून अधिक धर्मनिष्ठांनी लाभ घेतला.

इंदूर येथील सर्वसंपन्ननगर येथील रहिवासी आणि देवास येथील क्षत्रिय मराठा समाज यांच्यासाठी ‘हलाल जिहाद’ या विषयावर जनजागृती करणारी बैठक पार पडली. सर्वसंपन्ननगर येथील बैठकीसाठी श्री. आशिष साध यांनी, तर क्षत्रिय मराठा समाजाच्या बैठकीसाठी युवाध्यक्ष श्री. समरजित सिंह जाधव यांनी प्रयत्न केले. या दोन्ही बैठकांना नागरिक आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

_______________________________

अल्पसंख्यांकांना मिळणारे अधिकार बहुसंख्यांक हिंदूंना का नाहीत ? – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

आज मुसलमान असो किंवा ख्रिस्ती जागतिक स्तरावर त्यांच्या पंथांचे रक्षण आणि प्रचार यांसाठी संघटित असतात. हिंदू भारतात बहुसंख्य असले, तरी जागतिक स्तरावर अल्पसंख्यांक आहेत. हिंदूंचे त्यांच्या धर्माप्रती समर्पण नाही. त्यामुळे आज भारतात अल्पसंख्यांकांना जे अधिकार मिळत आहेत, ते बहुसंख्यांक असूनही हिंदूंना मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याला या धर्म-अधर्माच्या युद्धात पांडवांसारखा संघर्ष करावा लागेल. भारत हिंदु राष्ट्र होणे, हाच सर्व समस्यांवर उपाय आहे. त्यामुळे त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.