यवतमाळ येथे ठिकठिकाणी निवेदने

यवतमाळ, १९ जून (वार्ता.) – श्री क्षेत्र पंढरपूर येथील कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या स्वयंभू श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भातील निवेदन यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे पदाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. ‘मूर्ती संवर्धनाचे कायदेशीर उत्तरदायित्व निश्चित करावे आणि धर्मशास्त्र, तसेच आयुर्वेद पद्धतीनुसारच लेपन करावे’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येत्या २३ आणि २४ जून या दिवशी पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून रासायनिक लेपन करण्याचा घाट घातला जात आहे.
निवेदन देतांना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता राजेंद्र गटलेवार, ‘हिंदुस्तानी देवी मंदिर’ (आठवडी बाजार) चे श्री. आनंद त्रिवेदी, रेणुका माता मंदिराचे श्री. महादेवराव काचोरे, नृसिंह सरस्वती दत्तात्रय संस्थानचे श्री. चंद्रकांत पानपट्टीवार, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. दत्तात्रय फोकमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
बाभूळगाव (जिल्हा यवतमाळ) येथेही महासंघाच्या वतीने तहसीलदार सौ. मीरा पागोरे यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य सर्जेराव वाईकर, यादवरावजी खेरडे, श्रीकृष्ण उरकुडे, पंकजराव देशमुख, प्रदीप शिंदे, महासंघाचे बाभुळगाव तालुका संयोजक मोतीराम उरकुडे उपस्थित होते.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर