
पुणे – पुणे शहराला देशातील एक प्रमुख ‘रेल्वे हब’ (रेल्वे केंद्र) बनवण्यासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. ६ नवीन फलाट बांधून आणि विद्यमान सुविधांचा विस्तार करून आम्ही पुणे स्थानकातील फलाटांची संख्या १२ पर्यंत वाढवत आहोत अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केली. या वेळी त्यांच्या हस्ते ‘पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस’ आणि ‘पुणे-दानापूर अमृत भारत एक्सप्रेस’लाही हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.
राज्यातील १३२ रेल्वेस्थानकांवरील पुनर्विकासाचे काम वेगाने चालू असून ही कामे पुढील ३ वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले. गाड्यांचा खोळंबा टाळण्यासाठी ‘रेल्वे यार्ड’चे (रेल्वे गाड्यांचे डबे आणि इंजिने थांबवली जातात. त्यांची छाटनी केली जाते, तसेच माल किंवा प्रवाशांची चढ-उतार केली जाते, त्या ठिकाणाचे) संपूर्ण पुनर्रचना आणि अत्याधुनिक ‘स्कायवॉक’ (पादचारी आकाशमार्ग) उभारण्यात येणार आहे, तसेच आळंदी येथे ‘मेगा टर्मिनल’चा (विशाल प्रवासी केंद्राचा) विकास करण्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी केली.
या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) जोडले होते, तर कार्यक्रमाच्या ठिकाणी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद सदस्य विवेक कोल्हे आणि इतर मान्यवरही उपस्थित होते.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !