
रत्नागिरी, १८ जून (जिमाका) – पावसाळा पूर्वतयारी २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या निर्देशानुसार १८ जूनला चिपळूण येथील गोवळकोट धक्का येथे आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) यशस्वीरित्या पार पडली. पावसाळाच्या काळात उद्भवणार्या संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा किती तत्पर आहे ? याची चाचपणी या माध्यमातून करण्यात आली.
१. अचानक गोवळकोट धक्का येथे एक व्यक्ती पाण्यात बुडाल्याची माहिती तहसीलदार कार्यालय आणि नगर परिषदेच्या नियंत्रण कक्षाकडून (कंट्रोल रूम) सर्व संबंधित विभागांना फोनद्वारे देण्यात आली. या संदेशानंतर तात्काळ हालचाली करत सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या साधनांसह अवघ्या काही मिनिटांत गोवळकोट धक्का येथे दाखल झाले.
२. सर्व यंत्रणा घटनास्थळी पोचल्यानंतर ही प्रत्यक्षात घडलेली दुर्घटना नसून पावसाळा पूर्वसिद्धतेच्या अनुषंगाने घेण्यात आलेले ‘मॉक ड्रिल’ असल्याचा निरोप देण्यात आला. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. या तातडीच्या कॉलवर सर्व यंत्रणांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
३. यानंतर उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने बोट आणि बचाव साहित्य, बोटीचा वापर, लाईफ जॅकेटचे महत्त्व आणि ते वापरण्याची पद्धत, बुडालेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर करायचे प्रथमोपचार, पूर किंवा अतीवृष्टीच्या काळात घ्यावयाची काळजी आदी महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
४. या रंगीत तालमीत तहसीलदार कार्यालय, चिपळूण, मंडळ अधिकारी गोवळकोट, चिपळूण नगर परिषद फायर ब्रिगेड गाडी, रेस्क्यू बोट आणि लाईफ जॅकेटसह कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. तालुका आरोग्य विभागामार्फत डॉक्टर्स, कर्मचारी आणि सुसज्ज रुग्णवाहिका, पोलीस विभाग, गोवळकोटच्या नगरसेविका, ग्राम महसूल अधिकारी आणि स्थानिक ’आपदा मित्र’ स्वयंसेवकसुद्धा सहभागी होते.
५. ‘पावसाळाच्या कोणतीही आपत्ती आल्यास प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन तहसीलदार प्रविण लोकरे यांनी या वेळी केले.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसरातील विविध कामांचा शुभारंभ आज होणार !
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
लोटे (खेड) येथील औद्योगिक वसाहत आणि परिसरातील गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
गडचिरोलीमधील लोहखनिज खाणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !