कमी दराच्या निविदेमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह !

पुणे – पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांनी जलपर्णीविषयी विचारलेल्या प्रश्नाला प्रशासनाने उत्तर देतांना सांगितले की, वर्ष २०२३-२४ पासून मुळा-मुठा नद्यांसह तलावातील जलपर्णी काढण्याचे काम हाती घेण्यात आले. गेल्या ४ वर्षांत १२ कामांतर्गत १२ कोटी ८८ लाख रुपये संमत करण्यात आले. त्यांपैकी ७ कोटी ९७ लाख रुपये ठेकेदाराला देण्यात आले आहेत.
नदी तलावातील जलपर्णी काढून दूरवर टाकणे अपेक्षित असतांना ती नदी किंवा तलावाच्या बाजूलाच टाकल्याने पावसाळ्यात ती परत पाण्यात वहात येते आणि वाढते. पूर्वगणनपत्रकापेक्षा ३०-४० टक्के दराने निविदा संमत केल्याने ठेकेदार पूर्ण क्षमतेने काम करत नाही. त्यामुळे जलपर्णी काढण्याच्या प्रक्रियेत पैशांचा अपव्यय होत आहे. (अभ्यासपूर्ण योजना न राबवणारे, तसेच महापालिकेच्या पैशांचा अपव्यय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांवर कठोर कारवाई व्हावी ! – संपादक)
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
व्हीलचेअरअभावी आजारी महिला नगरसेविकेला उचलून नेण्याची नामुष्की !
पाणीटंचाईची समस्या मांडतांना विषय भरकटल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक समोरासमोर
पुणे रेल्वेस्थानकाचा ६०० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सिद्ध ! – श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !