अमेरिकेला भारतीय वंशाचे राष्ट्राध्यक्ष मिळण्याची शक्यता !

भारतीय वंशाच्या निक्की हेली यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारासाठीची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर दावा केला आहे. त्यामुळे आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्यासाठी ट्रम्प आणि निक्की यांच्यात लढत होणार आहे.

जागतिक स्तरावर भारताची सर्वांत मोठी आणि गतीशील आर्थिक वृद्धी  निश्चित होणार !

आता, रे डालियो यांना आता कुणा धर्मनिरपेक्ष उपटसुंभाने ‘भाजपचा एजंट’ म्हटले, तर आश्चर्य वाटायला नको !

‘यूट्यूब’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय वंशाचे नील मोहन यांची नियुक्ती

याविषयी ‘यूट्यूब’चे मूळ आस्थापन ‘अल्फाबेट इंक’ने घोषणा केली आहे. सुसान व्होजिकी हे या पदावरून पायउतार झाल्यानंतर नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीबीसीच्या कार्यालयांत सलग दुसर्‍या दिवशीही आयकर विभागाकडून सर्वेक्षण चालू !  

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमिततेचा आरोप केला आहे. अनेक घंट्यांपासून अधिकारी भ्रमण संगणक आणि कागदपत्रे यांची छाननी करत आहेत.

विदेशात हिंदुविरोधाची वाढती लाट !

डाव्‍या विचारसरणीच्‍या संस्‍था आणि प्रसारमाध्‍यमे ‘हिंदु राष्‍ट्रीयत्‍व अन् हिंदुत्‍व हे संभाव्‍य संकट आहे’, असा अप्रचार करून हिंदूंचा अपमान करून सनातन धर्माच्‍या अनुयायांविषयी द्वेष निर्माण करत आहेत.

रशिया तात्काळ सोडा !

अमेरिकेने रशियात रहाणार्‍या तिच्या नागरिकांना तात्काळ रशिया सोडण्यास सांगितले आहे. ‘रशियाचे अधिकारी अमेरिकेच्या नागरिकांना विनाकारण अटक करू शकतात’, या भीतीमुळे दूतावासाने ही सूचना केली आहे.

अमेरिकेच्या हवाई सीमेत ‘एलियन्स’ येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही ! – अमेरिकेचे सैन्याधिकारी

नुकतेच अमेरिकेने त्याच्या सीमेत घुसलेल्या चीनच्या मोठ्या फुग्याला क्षेपणास्त्र डागून पाडले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांत ४ संशयास्पद वस्तूही पाडण्यात आल्या आहेत.

रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात भारत पहिल्या क्रमांकावर !

युक्रेन युद्धामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचा दोन्ही देशांतील शस्त्रास्त्रांच्या खरेदीवर कोणताही परिणाम झाला नाही.

मोदी युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांचे मन वळवू शकतात ! – अमेरिका

रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेले युद्ध संपवण्यासाठी भारताचे पंतप्रधान मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मन वळवू शकतात, असा दावा अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’चे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी केले.

अमेरिकेत आता दिसली हवेत उडणारी वस्तू !

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी हेरगिरी करणारा फुगा आढळून आल्यानंतर आता अलास्का येथे पुन्हा हवेत उडणारी एक वस्तू दिसली. ही वस्तू हवेत ४० सहस्र फूट उंचीवर उडत होती. त्यानंतर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी ही वस्तू पाडली.