विदेशात हिंदुविरोधाची वाढती लाट !

डाव्‍या विचारसरणीच्‍या संस्‍था आणि प्रसारमाध्‍यमे ‘हिंदु राष्‍ट्रीयत्‍व अन् हिंदुत्‍व हे संभाव्‍य संकट आहे’, असा अप्रचार करून हिंदूंचा अपमान करून सनातन धर्माच्‍या अनुयायांविषयी द्वेष निर्माण करत आहेत. गेल्‍या वर्षी वॉशिंग्‍टनमधून हिंदू बाहेर पडण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे. ‘अमेरिका, इंग्‍लंड आणि कॅनडा या देशांमध्‍ये भारतविरोधी भावना वाढत चालली आहे का ?’, या प्रश्‍नाला उत्तर देतांना डॉ. जयशंकर म्‍हणाले, ‘‘भारत जेवढ्या अधिक गतीने पुढे चालला आहे, तेवढे जे लोक स्‍वतःला भारताला स्‍वतःची मक्‍तेदारी आणि त्‍याचे शिल्‍पकार समजतात, त्‍यांना आता देशात महत्त्व राहिलेले नाही. खरे म्‍हणजे अशी भाषा करणारे बाहेर पडले आहेत.’’ लेस्‍टर, इंग्‍लंड आणि न्‍यू जर्सी येथील डेमोक्रेट्‌सनी घेतलेला हिंदूच्‍या विरोधातील ठराव हे चर्चा करण्‍याच्‍या पलीकडचे आहे. या घटनांमुळे धार्मिक आणि बोलण्‍याचे स्‍वातंत्र्य यांविषयी भीती अन् आव्‍हान निर्माण झाले आहे. यामुळे अमेरिकेतील सुरक्षाविषयक गुप्‍तचर विभाग आणि सत्तेत असलेले पुरोगामी निओकॉन विंग यांच्‍या हुकूमशाहीवर प्रकाश पडला आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांच्‍या न्‍याय खात्‍याच्‍या स्‍कूल बोर्डचे ‘हिंसाचार’विषयक निवेदन लक्षात ठेवले पाहिजे.

१. अमेरिका आणि इंग्‍लंड येथे चालू असलेले हिंदुविरोधी अभियान

गेल्‍या काही मासांत अमेरिकेत भारत आणि हिंदु विरोधी भाषणे अन् हिंदुद्वेष यांमुळे घडलेले गुन्‍हे यांची मालिकाच चालू झाली आहे. न्‍यूयॉर्कमधील रिचमंड हिल्‍स भागातील हिंदु मंदिरात गुन्‍हेगारांनी म. गांधी यांच्‍या पुतळ्‍याची तोडफोड केली. तसेच टेक्‍सासमध्‍ये ‘एक महिला वर्णद्वेषी भाषा बोलून भारतीय महिलांना मारहाण करत आहे’, अशी चित्रफित सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित करण्‍यात आली. त्‍यानंतर इंग्‍लंडमधील लेस्‍टर येथे झालेल्‍या हिंदुविरोधी दंगलीमध्‍ये जिहाद्यांनी हिंदूंची घरे आणि श्रद्धास्‍थाने यांची नासधूस केली. तसेच अल्‍पसंख्‍यांक असलेल्‍या हिंदूंना लक्ष्य करून त्‍यांच्‍यावर आक्रमण करण्‍यात आले. यामुळे जगभरातील हिंदूंना मोठा धक्‍का बसला.

२. न्‍यूजर्सी येथे ‘आझादी का अमृत महोत्‍सव’ कार्यक्रम अल्‍पसंख्‍यांकविरोधी ठरवून आयोजकांना क्षमा मागायला लावणे

यूजर्सी (अमेरिका) येथील शहरी भागाच्‍या बाहेर४० सहस्र रहिवासी असलेली टिनॅक टाऊनशिप आहे. या ठिकाणी ‘इंडियन बिझनेस असोसिएशन’च्‍या नावाखाली टिनॅकमधील भारतीय-अमेरिकी समाजाने ‘आझादी का अमृत महोत्‍सव’, म्‍हणजे ब्रिटिशांच्‍या जोखडातून भारत स्‍वतंत्र झाल्‍याच्‍या ७५ व्‍या वर्षपूर्तीनिमित्ताने एक संचलन आयोजित केले होते. या संचलनामध्‍ये इतर चित्ररथ, फलक यासोबत ‘बुलडोझर’ ठेवण्‍यात आला होता. याखेरीज आयोजकांनी उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे लावली होती. या संचलनानंतर आयोजकांविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्‍या. ‘इंडियन-अमेरिकन मुस्‍लिम कौन्‍सिल (आय.ए.एम्.सी.)’ हा भारतीय मुसलमानांचे प्रतिनिधित्‍व करणारा गट या संचालनाचा निषेध करण्‍यात आघाडीवर होता. ‘या संचलनातून नरेंद्र मोदी आणि योगी यांच्‍या अल्‍पसंख्‍यांकविरोधी धोरणाला मान्‍यता देण्‍यात आली’, असा आरोप त्‍यांनी केला. यानंतर लगेच ‘ब्‍लॅक लाईव्‍ह मॅटर’, ‘अमेरिकन मुस्‍लिम्‍स फॉर डेमॉक्रसी’, डाव्‍या विचारसरणीच्‍या संघटना आणि जिहादी गट सक्रीय झाले. आय.ए.एम्.सी. संघटनेने अमेरिकेचे न्‍याय खाते, न्‍यूजर्सीचे अटर्नी जनरल (महाधिवक्‍ता) आणि ‘फेडरल ब्‍युरो ऑफ इन्‍व्‍हेस्‍टिगेशन’ (एफ्.बी.आय.) यांच्‍याकडे ‘संचलन करणार्‍यांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली. याखेरीज या संघटनेने तेथील एडीसन पोलीस खात्‍याकडे तक्रार नोंदवली. या संघटनेने संचलनाचे प्रमुख अतिथी ‘भाजपचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते संबित पात्रा यांचा पारपत्र (व्‍हिसा) रहित करावा’, अशी मागणीही केली.

नगरपालिकेचे अध्‍यक्ष अ‍ॅलेक्‍झेंडर सोरिआनो तावेसर यांच्‍या नेतृत्‍वाखाली टिनॅक येथील डेमोक्रेट्‍स पक्षाच्‍या सदस्‍यांनी संचलनाचे आयोजन करणार्‍या हिंदु संघटनांचा उल्लेख ‘विदेशी द्वेष करणारे गट’, असा केला. अमेरिकचे सिनेटर बॉब मेनिनडेझ आणि कोरी बुकर यांच्‍यासह अनेक प्रमुख डेमोक्रॅट्‍सनी आय.ए.एम्.सी. संघटनेची बाजू घेत विधाने केली.

३. हिंदुविरोधी गटांकडून हिंदूंमध्‍ये द्वेष निर्माण करण्‍याचा प्रयत्न

टिनॅक येथील डेमोक्रेट्‍सनी स्‍पष्‍टपणे केलेला हिंदुविरोधी ठराव, ‘इंडियन-अमेरिकन मुस्‍लिम कौन्‍सिल’ आणि इतर हिंदुविरोधी गट यांमुळे भारताला देवभूमी अन् मातृभूमी मानणार्‍या हिंदूंसमोर समस्‍या निर्माण झाली आहे. डाव्‍या विचारसरणीच्‍या संस्‍था आणि प्रसारमाध्‍यमे यांमुळे हिंदूंविषयीची नकारात्‍मक प्रतिमा सिद्ध झाली आहे. त्‍यामुळे ते काहीही समजून न घेता आणि संदर्भ न पहाता हिंदू, राष्‍ट्रीयत्‍व, हिंदुत्‍व आणि जातीय दडपशाही या विषयांची भूते नाचवत आहेत. हिंदूंचा अपमान करणे आणि जगातील प्राचीन अन् सर्वांत उदार विचारसरणी असलेल्‍या हिंदु धर्माच्‍या अनुुयायांविषयी द्वेष निर्माण करण्‍यासाठी ते हे सर्व करत आहेत.

४. भारताविषयीचे कथित भाष्‍य आणि वस्‍तूस्‍थिती यांमधील तफावत

पाश्‍चिमात्‍यांची भारतीय संस्‍कृती, साहित्‍य आणि परंपरा यांविषयीची असलेली धारणा अन् प्रत्‍यक्ष वस्‍तूस्‍थिती यांमध्‍ये तफावत आहे, हे आता गुपित राहिलेले नाही. अलीकडेच ‘प्‍यू रिसर्च सेंटर’ने ‘रिलीजन्‍स ऑफ इंडिया’ या विषयावर केलेल्‍या सर्वेक्षणातून कथित गोष्‍टी आणि प्रत्‍यक्ष वस्‍तूस्‍थिती यांतील तफावत लक्षात येते. ‘हिंदू हे मूळ भारतातील नाहीत’, हा कुसंस्‍कार पाश्‍चिमात्‍यांमध्‍ये दृढ झाला आहे. शैक्षणिक आणि प्रसिद्ध सादरीकरणातूनही त्‍याचे प्रकटीकरण होत असते.

५. अमेरिकेतील भारतीय समाजाने नेतृत्‍व करणे आवश्‍यक !

अमेरिकी समाजातील भारतीय सदस्‍य उच्‍च राजकीय पदांवर असूनही हिंदूच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी पुढाकार घेतांना किंवा नेतृत्‍व स्‍वीकारतांना दिसत नाहीत. अलीकडेच अमेरिकेतील हिंदूंवर झालेल्‍या आक्रमणांतून ही उणीव स्‍पष्‍ट झाली आहे. सर्वांत वाईट गोष्‍ट म्‍हणजे अनेक हिंदू हे पुरोगामी अमेरिकी लोकांच्‍या वर्णविषयक विधानांमध्‍ये अडकलेले आहेत. त्‍यांना एकतर हिंदुद्वेष दिसत नाही किंवा हिंदुत्‍वाला प्रोत्‍साहन देण्‍याच्‍या भीतीपोटी ते जाणीवपूर्वक त्‍याकडे दुर्लक्ष करत आहेत. उदाहरणार्थ टेक्‍सास येथे हिंदुद्वेषापोटी लक्ष्य ठरलेल्‍या एका कुटुंबातील सदस्‍याने ‘या घटनेचा उपयोग राष्‍ट्रीय स्‍तरावर प्रचार करण्‍यासाठी करू नये’, असे ट्‍वीट केले आहे.

– अवंतस कुमार

(साभार : साप्‍ताहिक ‘ऑर्गनायझर’, १७.१०.२०२२)