अमेरिकेच्या हवाई सीमेत ‘एलियन्स’ येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही ! – अमेरिकेचे सैन्याधिकारी

(‘एलियन्स’ म्हणजे परग्रहनिवासी)

जनरल ग्लेन वॉनहर्क

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या वायूदलाने पाडलेल्या वस्तू ‘एलियन्स’शी (परग्रहनिवासी यांच्याशी) संबंधित आहेत कि नाहीत, हे सांगता येणार नाही; परंतु तशी शक्यता नाकारता येत नाही. आमचे तज्ञ त्याचा अभ्यास करून कोणती माहिती मांडतात, त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. आपण ते काम तज्ञांवर सोपवू. आम्ही देशासमोर कोणतेही ज्ञात-अज्ञात धोके ओळखून त्याची माहिती गोळा करत असतो, अशी माहिती ‘यूएस् नॉर्थ अमेरिकन एयरोस्पेस डिफेन्स कमांड’ आणि ‘नॉर्दर्न कमांड’चे प्रमुख एअर फोर्स जनरल ग्लेन वॉनहर्क यांनी दिली आहे. नुकतेच अमेरिकेने त्याच्या सीमेत घुसलेल्या चीनच्या मोठ्या फुग्याला क्षेपणास्त्र डागून पाडले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांत ४ संशयास्पद वस्तूही पाडण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वॉनहर्क यांनी ही माहिती दिली.

अमेरिकेने ६ चिनी आस्थापनांना टाकले काळ्या सूचीत !

दुसरीकडे अमेरिकने चीनच्या ६ आस्थापनांना काळ्या सूचीमध्ये टाकले आहे. ही आस्थापने चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेने हे पाऊल चीनच्या हेरगिरी करणार्‍या फुग्याच्या प्रकरणानंतर उचलले आहे.