अमेरिकेत आता दिसली हवेत उडणारी वस्तू !

वॉश्गिंटन – अमेरिकेत काही दिवसांपूर्वी हेरगिरी करणारा फुगा आढळून आल्यानंतर आता अलास्का येथे पुन्हा हवेत उडणारी एक वस्तू दिसली. ही वस्तू हवेत ४० सहस्र फूट उंचीवर उडत होती. त्यानंतर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी ही वस्तू पाडली. ही वस्तू कुणी पाठवली ? कुठून आली ? आणि ती पाठवण्यामागील उद्देश काय ? याविषयी अद्याप अमेरिकेला माहिती मिळू शकलेली नाही. अमेरिकेच्या याच लढाऊ विमानांनी अशाच प्रकारे हेरगिरी करणारा फुगाही नुकताच नष्ट केला होता.

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने केलेल्या दाव्यानुसार, चीन गुप्तचर फुग्यांद्वारे जगभरातील देशांच्या सैनिकी तळांवर लक्ष ठेवत आहे. चीनने अशी हेरगिरी केलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.