पाकिस्तानमध्ये  १२ हून अधिक जिहादी आतंकवादी संघटनांची मुख्य केंद्रे ! – भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली

पाकिस्तानमध्ये कमीतकमी १२ हून अधिक जिहादी आतंकवादी संघटनांची मुख्य केंद्रे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतेही आर्थिक साहाय्य दिले जाऊ नये, असे विधान अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी घोषित केलेल्या निक्की हेली यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत झाला ! – क्रिस्टोफर व्रे, संचालक, एफ्.बी.आय

कोरोनाच्या उत्पत्तीविषयी आम्ही गेल्या काही वर्षांपासून संशोधन करत आहोत. यात आम्ही जी निरीक्षणे नोंदवली आहेत, त्यानुसार कोरोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याची दाट शक्यता आहे, असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर अन्वेषण विभागाचे (एफ्.बी.आय.चे) संचालक क्रिस्टोफर व्रे यांनी केला.

भारत आणि चीन यांनी रशियाला अणूबाँबचा वापर करण्यापासून रोखणे महत्त्वाचे ! – अमेरिका

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले होते की, चीन आणि भारत यांच्यामुळेच रशियाने युक्रेनवर अणूबाँबद्वारे आक्रमण केलेले नाही.

अमेरिकेसारखा एकाधिकार न ठेवता जगाला बहुकेंद्रीत करण्याचा रशियाचा प्रयत्न ! – पुतिन

अमेरिकी सरकारकडून युरोपीय व्यवसाय अमेरिकेच्या भूमीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑस्ट्रेलियाने फ्रान्समधील एका उत्पादकाशी होत असलेला करार अचानक रहित करून तो एका अमेरिकी स्पर्धक आस्थापनाशी केला.

व्हिडिओ गेम खेळण्यास थांबवल्याने विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला अमानुष मारहाण !

विद्यार्थी वर्गात व्हिडिओ गेम खेळत असल्याने शिक्षिकेने ते थांबवण्यास सांगितल्यावर त्याला राग आला आणि त्यातून त्याने शिक्षिकेला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे.

दक्षिण चीन समुद्रावर चीनच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेच्या नौदलाच्या विमानाला रोखले !

काही मिनिटांतच हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेल्या चिनी लढाऊ विमानाने अमेरिकी विमानाला रोखले. यानंतर अमेरिकेच्या विमानाने तेथून माघार घेतली.

राष्ट्राध्यक्ष बनल्यास शत्रूराष्ट्रांना देण्यात येणारे साहाय्य बंद करू ! – निक्की हेली

मी राष्ट्राध्यक्ष बनल्यास अमेरिकेच्या शत्रूंना करण्यात येणारे आर्थिक साहाय्य पूर्णपणे थांबवेन, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी स्वतःच्या नावाची घोषणा करणार्‍या भारतीय वंशाच्या नेत्या निक्की हेली यांनी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारू इच्छितो ! – इराण

इराकची राजधानी बगदादमध्ये वर्ष २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन आक्रमणामध्ये इराणी सैन्य कमांडर कासिम सुलेमानी याचा मृत्यू झाल्याच्या काही दिवसांनंतर जेव्हा इराणने अमेरिकेच्या नेतृत्वातील सैन्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले, तेव्हा बिचार्‍या सैनिकांना मारण्याचा हेतू नव्हता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अचानक युक्रेनच्या भेटीवर !

युक्रेनला आणखी आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्याची घोषणा !
रशिया-युक्रेन युद्धाला २४ फेब्रुवारीला होणार १ वर्ष पूर्ण !

आता अमेरिकेच्या हवाई परिसरात दिसला हेरगिरी करणारा फुगा !

हा फुगा ५० सहस्र फूट उंचीवर असल्याची माहिती मिळाली असली, तरी अमेरिकी अधिकारी आणि हवाई वाहतूक नियंत्रण विभाग यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.