म्यानमारमध्ये सैन्याकडून सत्तापालट !
म्यानमारचे राष्ट्रपती विन म्यिंट, सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना सैन्याकडून अटक करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.