‘यूट्यूब’च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय वंशाचे नील मोहन यांची नियुक्ती

‘यूट्यूब’चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन

नवी देहली – अमेरिकास्थित भारतीय वंशाचे नील मोहन यांची ‘यूट्यूब’चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी ‘यूट्यूब’चे मूळ आस्थापन ‘अल्फाबेट इंक’ने घोषणा केली आहे.

सुसान व्होजिकी हे या पदावरून पायउतार झाल्यानंतर नील मोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कौटुंबिक, आरोग्य आणि वैयक्तिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी यूट्यूबचे त्यागपत्र देत असल्याचे सुसान व्होजिकी यांनी सांगितले होते. नील मोहन हे वर्ष २००८ मध्ये गूगलमध्ये नोकरीला लागले होते. नील मोहन आणि सुसान व्होजिकी यांनी १५ वर्षे एकत्र काम केले आहे.