नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादू नये ! – आमदार गणेश नाईक, भाजप

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर येत्या काही दिवसांत २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नवी मुंबईकरांवर कोणताही करवाढ नये, अशी सूचना भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुवेतहून भारतात आलेल्या ३ आरोपींना जामीन !; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद !…

कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.

क्षुल्लक कारणावरून टोळक्याची तरुणाला मारहाण, चारचाकी गाडी, तसेच महिलेलाही पेटवण्याचा प्रयत्न !

पुण्याच्या खराडी परिसरात ‘रेकॉर्ड’वरील (पोलिसांकडे नोंद असलेले) गुन्हेगारांनी महेश राजे या तरुणाला क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. त्यानंतर त्याची चारचाकी गाडी पेटवून दिली, तसेच त्यांनी एका महिलेलाही पेटवण्याचा प्रयत्न केला.

दोन आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी !

घोडबंदर येथील एका वृद्ध दांपत्याच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. निसार अहमद कुतबुद्दीन शेख (वय २७ वर्षे) आणि रोहित उत्तेकर (वय २६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.

जागरूक अधिवक्ता ही उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

लोकशाहीची शक्ती म्हणजे जागरूक नागरिक, तर उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती म्हणजे जागरूक अधिवक्ता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.

आई-वडील, सासू-सासरे समवेत असतील, तर महिलांना निराशा येण्याचे प्रमाण अल्प ! – हेलसिंकी विद्यापिठ, फिनलँड

आई-वडील, आजी-आजोबा किंवा सासू-सासरे समवेत असल्यास आई झालेल्या महिलांच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो, असे फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापिठाने केलेल्या एका नव्या अभ्यासातून उघड झाले आहे.

Stop Harassing Chinese : चिनी विद्यार्थ्यांना त्रास देणे थांबवा ! – चीन

चीनचे सार्वजनिक सुरक्षामंत्री वांग शिओहोंग यांनी अमेरिकेचे ‘होमलँड सिक्युरिटी’चे सचिव अलेजांद्रो मेयोर्कास यांना सांगितले की, कागदपत्रे असूनही अमेरिकी विमानतळांवर चिनी विद्यार्थ्यांची कडक चौकशी केली जाते.

भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या सैन्य अभ्यासात ५१ देशांचे नौदल सहभागी !

भारतीय नौदलाने १९ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम् येथे ‘मिलन-२४’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांत मोठा सैन्य अभ्यास चालू केला आहे. यामध्ये ५१ देशांचे नौदल सहभागी झाले आहे.

Kalki Temple : संभल (उत्तरप्रदेश) येथील प्राचीन कल्कि मंदिर पाडून बांधण्यात आली आहे शाही जामा मशीद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नव्या कल्कि मंदिराची पायाभरणी !

इंडोनेशियाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रबोवो सुबियांतो यांची निवड !

जगातील सर्वांत मोठा मुसलमान देश असलेल्या इंडोनेशियात नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रबोवो सुबियांतो यांची निवड झाली आहे. तज्ञांच्या मते सुबियांतो सत्तेत आल्यानंतर भारतासमवेतचे इंडोनेशियाचे संबंध अधिक घट्ट होऊ शकतात.