दोन आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी !

वृद्ध दांपत्याच्या हत्येचे प्रकरण

ठाणे – घोडबंदर येथील एका वृद्ध दांपत्याच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. निसार अहमद कुतबुद्दीन शेख (वय २७ वर्षे) आणि रोहित उत्तेकर (वय २६ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना ठाणे न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सिंह दांपत्य

या दोघांनी त्यांच्याच इमारतीत १४ व्या मजल्यावरील सदनिकेत रहाणार्‍या सिंह दांपत्याची हत्या केली होती. त्यांनी सिंह यांच्या घरातील स्नानगृहामध्ये बाहेरून प्रवेश केला होता. हत्येनंतर घरातील भ्रमणभाष, सोन्याचे दागिने यांची चोरी करून तेथून पळ काढला. भ्रमणभाष आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.