विशाखापट्टणम् – भारतीय नौदलाने १९ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम् येथे ‘मिलन-२४’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांत मोठा सैन्य अभ्यास चालू केला आहे. यामध्ये ५१ देशांचे नौदल सहभागी झाले आहे. या युद्धाभ्यासामध्ये सहभागी होण्यासाठी विविध देशांच्या ३५ प्रमुख युद्धनौका आणि ५० विमाने भारतात पोचली आहेत. हा सैन्य अभ्यास २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘मिलन-२४’ हा सैन्य अभ्यास प्रत्येक २ वर्षांनी आयोजित केला जातो. वर्ष १९९५ मध्ये केवळ ४ देशांसोबत हा सैन्य अभ्यास चालू झाला होता. आता याची व्याप्ती वाढली आहे.
सौजन्य रिपब्लिक वर्ल्ड
अमेरिका व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, जपान, व्हिएतनाम, थायलंड, मालदीव, ब्रिटन, मलेशिया, कॅनडा, स्पेन, जर्मनी, इटली, दक्षिण कोरिया, बांगलादेश, इंडोनेशिया, म्यानमार, इराक, ब्राझील आणि येमेन या देशांनीही त्यांचे प्रतिनिधी ‘मिलन-२४’ला पाठवले आहेत.