Kalki Temple : संभल (उत्तरप्रदेश) येथील प्राचीन कल्कि मंदिर पाडून बांधण्यात आली आहे शाही जामा मशीद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नव्या कल्कि मंदिराची पायाभरणी !

प्राचीन कल्कि मंदिर पाडून बांधण्यात आलेली शाही जामा मशीद

संभल (उत्तरप्रदेश) – भगवान कल्कि भगवान विष्णूचा शेवटचा अवतार असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे बांधण्यात येणार्‍या भगवान कल्कि मंदिराची पायाभरणी केली. या वेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. धर्मशास्त्रानुसार भगवान कल्कि यांचा जन्म याच संभलमध्ये होणार आहे. ५०० वर्षांपूर्वीही येथे भगवान कल्कि यांचे मंदिर होते; मात्र बाबरने ज्याप्रमाणे अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे मशीद बांधली, त्याप्रमाणेच येथेही कल्कि मंदिर पाडून तेथे शाही जामा मशीद बांधण्यात आली. बाबरने पानीपत येथे काबुली बाग मशीद बांधली आहे. येथील युद्धात इब्राहिम लोदी याच्यावरील विजयाच्या स्मरणार्थ ही मशीद बांधण्यात आली. या मशिदीचे नाव त्याने स्वतःची पत्नी काबुली बेगम हिच्या नावावर ठेवले.

इतिहासकारांच्या मते बाबरच्या आदेशानुसार वर्ष १५२८ मध्ये त्याचा विश्‍वासू मीर बेग याने कल्कि मंदिर नष्ट केले आणि मंदिराच्या अवशेषांवर मशीद बांधली. आजही मशीदीच्या भिंतीवर आणि इतर गोष्टींवर मंदिराचे अवशेष दिसतात.

५ एकर परिसरात असणार कल्कि मंदिर !

(डावीकडून) उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कल्कि पीठाधीश्‍वर आचार्य प्रमोद कृष्णम व पंतप्रधान नरेंद्र मोदी

कल्कि पीठाधीश्‍वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी संभलमध्ये भव्य कल्कि मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. हे मंदिरही त्याच गुलाबी दगडांनी बांधले जाईल, ज्यापासून अयोध्येतील श्रीराममंदिर बांधले आहे. भगवान कल्कि मंदिर ५ एकराच्या परिसरात असणार आहे. मंदिर ११ फूट उंचीवर बांधण्यात येणार असून शिखराची उंची १०८ फूट असणार आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमान आक्रमकांनी मंदिरे नष्ट करून जेथे जेथे मशिदी बांधल्या आहेत, ती सर्व स्थाने जोपर्यंत मुक्त होत नाहीत, तोपर्यंत हिंदूंनी संघर्ष करत राहिला पाहिजे !