पुणे येथे ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचा प्रकाशन सोहळा मान्‍यवरांच्‍या उपस्‍थितीत पार पडला !

विंग कमांडर श्री. विनायक डावरे (निवृत्त) यांच्‍या हस्‍ते ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. ‘शतपैलू सावरकर’ या पुस्‍तकाचे लेखक कै. ह.त्र्यं. देसाई यांचे पुत्र श्री. भरत देसाई हे कार्यक्रमाला उपस्‍थित होते.

पुणे येथे शाळेच्‍या गाड्या, बसगाड्या यांची झडती !

खराडी परिसरात शाळेच्‍या गाडीला लागलेल्‍या आगीच्‍या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकांची संख्‍या वाढवून पुणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने (‘आर्.टी.ओ.’ने) सर्व शाळेच्‍या गाड्या, बस यांची पडताळणी चालू केली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : ट्रेलरची फूड कोर्टला भीषण धडक; मुंबईत पोर्शे कारची दुचाकींना धडक !…

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भरधाव ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्‍याने ट्रेलरने फूड कोर्टला भीषण धडक दिली. यात हॉटेल कामगार इंद्रदेव पासवान याचा मृत्‍यू झाला.

पोलिसांनी हे लक्षात घेतले पाहिजे !

‘पोलिसांना ‘जनता आपली मुले आहेत’, असे वाटले पाहिजे, तरच त्यांच्याकडून नोकरी योग्य तर्‍हेने होईल !’

भारत बांगलादेशाचा उन्‍मत्तपणा कधी संपवणार ?

बांगलादेशाचे निवृत्त मेजर शरीफ यांनी म्‍हटले की, भारत आणि अमेरिका हेदेखील आमच्‍यासमोर उभे राहू शकत नाहीत. आवश्‍यकता भासल्‍यास बांगलादेश ४ दिवसांत कोलकात्‍यावर नियंत्रण मिळवू शकतो.

आजचा वाढदिवस : कु. कृष्‍णप्रदा पी.ए

कन्‍नूर, केरळ येथील येथील कु. कृष्‍णप्रदा पी.ए (वय ९ वर्षे) हिचा मार्गशीर्ष शुक्‍ल नवमी (९.१२.२०२४) या दिवशी वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

संपादकीय : संस्‍कृतमधूनच संस्‍कृती !

संस्‍कृतला पुरो(अधो)गाम्‍यांनी लाथाडण्‍याचे आणखी एक कारण, म्‍हणजे तिला भटा-ब्राह्मणांची भाषा म्‍हणून हेटाळणी करणे ! त्‍या भाषेच्‍या जाणकारांनी बहुजनवर्गावर अन्‍याय केला म्‍हणे !

लोकलमधील मनमानी !

नियमांचे पालन करणे, हे प्रत्‍येक नागरिकाचे आद्यकर्तव्‍य असते; पण जे नियमांचे पालन करत नाहीत, त्‍यांना दंड आकारून त्‍याची जाणीव करून देण्‍याचे दायित्‍व तिकीट तपासनीसांचे असते

प्रपंचातील चिकाटी नामाला लावावी !

रामनवमीचा उत्‍सव संपला होता. सर्व सकाळी मंडळी सहज बसली असता श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज) म्‍हणाले, ‘उत्‍सवासाठी तुम्‍हा सर्वांना बरेच कष्‍ट झाले; पण प्रपंचाचे कष्‍ट त्‍या मानाने कितीतरी अधिक आहेत.