प्रपंचातील चिकाटी नामाला लावावी !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

रामनवमीचा उत्‍सव संपला होता. सर्व सकाळी मंडळी सहज बसली असता श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज) म्‍हणाले, ‘उत्‍सवासाठी तुम्‍हा सर्वांना बरेच कष्‍ट झाले; पण प्रपंचाचे कष्‍ट त्‍या मानाने कितीतरी अधिक आहेत. तुमच्‍या चिकाटीचेे मला खरोखर कौतुक वाटते. प्रपंच तुम्‍हाला पदोपदी कुम्‍हलत (लाथा मारणे) असतो; पण तुमची चिकाटी दांडगी ! तुम्‍ही अगदी मनापासून प्रपंचाला घट्ट चिकटून रहाता. यातील दहाव्‍या हिश्‍श्‍याची चिकाटी जरी भगवंताकडे लागली, तरी तो भगवंत सहज भेटेल; पण कुणी मनावर घेतच नाही.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या हृद्य आठवणी’ या पुस्‍तकातून, लेखक : ल.ग. मराठे)