कृष्‍णा आणि वारणा नद्यांतील मासे अन् मगरी यांचा मृत्‍यू !

प्रतीकात्मक छायाचित्र

सांगली, ११ डिसेंबर (वार्ता.) – येथील कृष्‍णा आणि वारणा नद्यांच्‍या पात्रात एका साखर कारखान्‍यातून मळीमिश्रीत पाणी सोडल्‍याने मासे अन् २ मगरी यांचा मृत्‍यू झाला आहे. ८ डिसेंबर या दिवशी ही गोष्‍ट नागरिकांना निदर्शनास आल्‍यानंतर याची माहिती सांगली आणि कोल्‍हापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्‍यात आली आहे. मंडळाच्‍या पथकाने संयुक्‍त पहाणी केली असता नदीच्‍या पाण्‍यात मळी सोडण्‍यात आल्‍याने मासे आणि मगरी यांचा मृत्‍यू झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. दुधगाव आणि कवठेपिरान येथील वारणा नदीच्‍या पात्रात मासे आणि मगरीच्‍या पिलाचा मृत्‍यू झाला आहे, तसेच उदगाव-अंकली पुलाखाली कृष्‍णा नदीत महाकाय मगर मृतावस्‍थेत आढळली आहे. प्रदूषण मंडळाकडून साखर कारखान्‍यावर कारवाई करण्‍यात येत आहे.