बांगलादेशातील अंतरिम सरकारची अंततः स्वीकृती !

ढाका (बांगलादेश) : शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर, विशेषतः हिंदूंवर झालेल्या आक्रमणांच्या ८८ घटना घडल्याची स्वीकृती बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने दिली. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या समवेत बैठक घेऊन अल्पसंख्यांकांवर होणार्या आक्रमणांचे सूत्र उपस्थित केले होते. तसेच त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. यानंतर बांगलादेश सरकारने वरील स्वीकृती दिली.
🚨 88 Incidents of Attacks on Minority Hindus in Bangladesh! 🚫
The Interim Government of Bangladesh has finally acknowledged the violence against Hindus, but mere acknowledgment is NOT enough! 💔 The government MUST ensure protection and compensation for the victims and prevent… pic.twitter.com/0FtJR0cvks
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 12, 2024
सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे प्रसारमाध्यम सचिव शफीकुल आलम यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर या कालावधीत अल्पसंख्यांकांशी संबंधित घटनांमध्ये एकूण ८८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या घटनांच्या संदर्भात ७० जणांना अटक करण्यात आली आहे. ईशान्य सुनामगंज, मध्य गाझीपूर आणि इतर भागांतूनही हिंसाचाराच्या नवीन घटना घडल्या आहेत, त्यामुळे प्रकरणे आणि अटकेची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पीडितांपैकी काही जण आधीच्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य असल्याची प्रकरणेही असू शकतात. २२ ऑक्टोबरनंतर घडलेल्या घटनांचा तपशील लवकरच प्रसारित केला जाईल.
संपादकीय भूमिका
|