मुंबई – माघी गणेशोत्सवाच्या सिद्धतेनिमित्त येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर ११ ते १६ डिसेंबरपर्यंत बंद रहाणार आहे. १७ डिसेंबरनंतर भाविक पुन्हा दर्शन घेऊ शकतात. या काळात सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.
मंदिर प्रशासनाकडून मूळ मूर्तीच्या समोर प्रतिकृती सिद्ध करण्यात आली आहे. तिचे दर्शन पुढील ५ दिवस भाविक घेऊ शकतात. माघी गणेशोत्सव १ फेब्रुवारी २०२५ या दिवशी होणार आहे.