(पॅरोल म्हणजे चांगल्या वर्तणुकीसाठी बंदीवानाला अटींवर काही दिवसांसाठी बाहेर सोडणे.)
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2020/09/05155957/Asaram-Bapu_P.jpg)
जोधपूर (राजस्थान) – कथित बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पू. आसारामजी बापू यांना राजस्थान उच्च न्यायालयाने १७ दिवसांचा पॅरोल संमत केला आहे. याआधी ३० दिवसांच्या पॅरोल मिळाल्यामुळे ते १० नोव्हेंबरपासून जोधपूरमधील खासगी आयुर्वेद रुग्णालयात उपचार घेत होते. पुण्यातील माधवबाग रुग्णालयात उपचारासाठी पू. बापू यांनी पॅरोलची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत १५ डिसेंबरपासून पुढील १७ दिवसांसाठी त्यांना पॅरोल संमत करण्यात आला.