महाराष्‍ट्रातील ११ जिल्‍ह्यांत बनावट औषधांचा पुरवठा !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – बनावट आस्‍थापनांद्वारे महाराष्‍ट्रातील ११ जिल्‍ह्यांत औषधे पुरवण्‍यात आली. जानेवारी २०२४ पासून सरकारी संस्‍थांमधून या औषधांचा पुरवठा झाला आहे. प्रथम धाराशिव जिल्‍ह्यातही बनावट औषधे पुरवण्‍यात आली; पण औषध विभागाने तो साठा प्रतिबंधित केल्‍याने औषधांचे वितरण झाले नाही; पण इतर जिल्‍ह्यांमध्‍ये बनावट औषधांचे वाटप झाले. या प्रकरणी सूरत आणि ठाणे येथे ४ जणांवर गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. धाराशिव येथे आलेला औषधसाठा परभणी, रायगड, रत्नागिरी, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, सिंधुदुर्ग, अमरावती, ठाणे आणि हिंगोली या जिल्‍ह्यांकडून पाठवला गेल्‍याचे समजते.

ज्‍या बनावट आस्‍थापनांच्‍या नावाने महाराष्‍ट्रात औषध पुरवठा करण्‍यात आला, ती आस्‍थापनेच अस्‍तित्‍वात नसल्‍याचे संबंधित राज्‍यांच्‍या वैद्यकीय यंत्रणांनी सांगितले. (जर आस्‍थापनेच अस्‍तित्‍वात नव्‍हती, तर मग औषध कोण देत होते ? यामागील सूत्रधाराचा शोध घ्‍यायला हवा ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

राज्‍यातील नागरिकांच्‍या आरोग्‍याशी खेळणार्‍यांना आजन्‍म कारावासातच डांबायला हवे !