मुंबई – निवडणूक आयोगाने यापूर्वीही सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीपुढे ‘इ.व्ही.एम्.’ ची विशेष पडताळणी घेतली होती; मात्र विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे विरोधी पक्ष याचे भांडवल करून जनतेची दिशाभूल करत आहेत. हे योग्य नाही.‘इ.व्ही.एम्.’वर आरोप करणार्यांकडे प्रमाणभूत आधार असेल, तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे. ‘इ.व्ही.एम्.’वरील संशय न्यायालयात टिकू शकणार नाहीत, असे ज्येष्ठ अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींपुढे व्यक्त केले.