सांगली, ११ डिसेंबर (वार्ता.) – येथील भाजपचे नूतन आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी १० डिसेंबर या दिवशी सांगली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पू. भिडेगुरुजींच्या हस्ते श्री. गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला. भेटीत पू. भिडेगुरुजी आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ, पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.