‘गुरुदेवांच्या चरणी मन अर्पण करायचे आहे’, हा विचार मनात येऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी केलेली आळवणी !

‘गुरुदेवांच्या चरणी मन अर्पण करायचे आहे’, असा मनात विचार आल्यावर ‘आपले मन निर्मळ नाही. आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या अधीन असलेल्या आपल्या बहिर्मुख मनाला गुरुदेवांच्या चरणी कसे अर्पण करायचे ?’, असे विचार मनात आले. त्या वेळी सुचलेली ही शब्दपुष्पे कवितेच्या रूपात दिली आहेत.

सावर्डे (जिल्हा रत्नागिरी) येथील सौ. वनिता शिवराम बांद्रे (वय ६४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

सावर्डे (तालुका चिपळूण) येथील सौ. वनिता शिवराम बांद्रे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी केली. १४ नोव्हेंबर या दिवशी हा कार्यक्रम येथील श्री. शिवराम बांद्रे यांच्या निवासस्थानी पार पडला…

साधना करून व्यक्तीने उच्च आध्यात्मिक पातळी गाठल्यास तिचे नाव, आडनाव, वेशभूषा अशा तिच्या कोणत्याही गोष्टीचा तिच्या स्वतःवर परिणाम होत नसणे

व्यक्तीवर होणारा आडनावाचा परिणाम हा पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांच्या स्तरावरील आहे. जर एखादी व्यक्ती साधना करून पंचतत्त्वांच्याही पुढच्या स्तरावर, म्हणजे निर्गुण स्तरावर गेल्यास तिच्यावर आडनावाचा परिणाम होणार नाही…

‘पंचतत्त्वे’ या शब्दाऐवजी ‘पंचमहाभूते’ हा शब्द प्रचलित होण्यामागील आध्यात्मिक कारण 

पंचतत्त्वे’ या शब्दाऐवजी ‘पंचमहाभूते’ हा शब्द प्रचलित कसा झाला ?’, याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.  

गोव्यात सरकारी नोकरी घोटाळा प्रकरणाचे राज्यभर लोण !

सरकारी खात्यांमध्ये नोकर्‍या मिळवण्यासाठी पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. या प्रकरणी सर्वसामान्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे, तसेच सरकारी भरती प्रक्रियेतील पारदर्शकता टिकून राहावी, यासाठी नोकरी घोटाळा प्रकरणाचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक आहे.

तलवारबाजीसाठी गोव्यातून सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग दळवी याची निवड

१७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या ६८ व्या राष्ट्रीय शालेय खेळ स्पर्धेसाठी गोव्यातून पर्वरी येथील एल्.डी. सामंत विद्यालयाचा विद्यार्थी, तसेच सनातनचा बालसाधक कु. श्रीरंग सुदेश दळवी (वय १३ वर्षे) याची निवड झाली आहे.